तुझा दुरावा…

तुझा दुरावा म्हणजे….जिवावरचं दुखणं…

उगाच धु्सफूस, तुझा आवाजही खुपणं…

तुझा दुरावा म्हणजे…अवघड वाट….

खाचा नि खळगे, ठेचांशी गाठ….

तुझा दुरावा म्हणजे… एक नाजुक विश्वास…

प्रेमाच्या युद्धानंतर एक शांत नि:श्वास…

तुझा दुरावा म्हणजे…. शब्दहीन संवाद…

तुझी निश्चल विरक्ती, माझा शुद्ध हटवाद…

तुझा दुरावा…म्हणजे धुक्याची दुलई….

थंडीची शिरशिरी अन निरशा दुधावर मलई….

तुझा दुरावा म्हणजे…

तुझा दुरावा म्हणजे आपल्या अवीट प्रेमाचा अजुन एक पुरावा….