आस…

माझ्या शब्दांचंही ओझं तुला झालंय…

माझ्या अश्रुंचीही नाही येणार सय…

म्हणाला होतास काल, हात घेउन हातात…

तुला भरून घेइन मी माझ्या मनात…

तुझा हात टाकून निघून नाही जाणार…

आता तुझा दिवस माझ्यासोबत सरणार…

मीही किती वेडी, खरंच मानून बसले…

तू गोड हसलास, म्हणून मीही हसले!

आज तू दूर आहेस, ही माझीच चूक आहे…

पण एकदा तू दिसावास अशी अजून भूक अहे…

का कोण जाणे पण अजून वाट बघतेय मी…

तू येशील परत म्हणून दारापाशीच थांबते मी…

तू गेलास दूर तरी ही आस कशी सरत नाही?

सगळी दुनिया वेड्यात काढते तरी मी हरत नाही…

कशी विसरू तुला राजा, तू माझा रोज अडकणारा घास…

आयुष्य फ़िरतं ज्याभोवती, तू माझ्या जगण्याचा आस…