आम्ही जितके चौकटीच्या आत दिसतो त्याच्या शतपट बाहेरच असतो…
तुमची नजर बांधलिये चौकोनी तारांनी..
बाहेर श्वास घेऊन तर पहा…या इथे आम्ही स्वच्छंद रमतो…

शकायचं तर शकता येतं…पण शकायचंच नसेल तर कसं शकणार?!

काळाला भूत भविष्याच्या काहीच सीमा नसतात. सीमा असतात, माणसाच्या मनाला….आठवणींच्या भूतकाळाच्या अन स्वप्नांच्या भविष्यकाळाच्या सीमा….

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, पण झोपल्याशिवय स्वप्न जरुर दिसतं, जे दि्सतंय तेच बघून घ्या, तेच शहाणपण असतं!!

तुझा राग हा पण प्रेमाचा एक आविष्कार….माझ्या रागाला तुझा उफराटा नकार!